आपल्या पिकासाठी आपण किसानहबच्या मोबाईल अँप मध्ये नोंद केलेल्या विविध कीड आणि रोगांच्या निरीक्षणांचे पध्दतशीर सादरीकरण आणि विश्लेषण आपल्याला " क्रॉप रिस्क मॉडेल" मध्ये पाहायला मिळते.  क्रॉप रिस्क मॉडेल मध्ये दिलेल्या माहितीवरून आपल्याला विविध भौगोलिक  भागांमध्ये कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव आणि त्याची तीव्रता याचा अंदाज येतो, त्यानुसार आपल्या व्यवसायाची पुढील दिशा ठरवता येते.

क्रॉप रिस्कची नोंद  घेण्यासाठी किसानहब मोबाइल अँप मध्ये खालील प्रकारे माहिती भरली जाते.  

१. किसानहबच्या मोबाइल अँपमध्ये लॉग इन केल्यावर "कीड आणि रोग” या आयकॉन वर क्लिक करावे. 



२) प्रथम ज्या प्लॉट साठी आपण निरीक्षण भरत आहे तो प्लॉट निवडावा.

३) निरीक्षणाची तारीख निवडावी.

४) आपल्या पिकासाठी ज्या किड किंवा रोगाची नोंद करायची आहे, त्या कीड किंवा रोगाचे नाव ड्रॉप डाउन  मधून निवडावे.  

५) निरीक्षणाची तीव्रता Low (कमी), Medium (मध्यम), High (जास्त) ह्या तीन प्रकारा पैकी एका प्रकाराची निवड करावी. 

भरलेल्या पीक निरीक्षणांचा अहवाल क्रॉप रिस्क रिपोर्ट तुम्हाला किसानहबच्या वेब प्लॅटफॉर्मवर खालील प्रकारे माहिती बघता येतो.

१) किसानहबच्या वेब प्लॅटफॉर्म लॉगिन केल्यावर  Supply Chain  या Menu वर  क्लिक केल्यावर खालील बाजूस “Crop Risk” हा पर्याय दिसेल. 

२)क्रॉप रिस्कचे  रिपोर्ट पाहण्यासाठी काही फिल्टर दिले आहेत त्याचा वापर पुढील पध्दतीने करावा.


  • तारखेची रेंज निवडा: आपणास ज्या तारखांमधील  निरीक्षणाचा रिपोर्ट बघायचा आहे त्या तारखा निवडा .

  • भौगोलिक विभाग (Regions):आपल्याला भौगोलिक विभागानुसार (आपल्या शेतकऱ्यांच्या गावानुसार किंवा आपण त्याचे जे ग्रुप तयार केले असतील त्यानुसार) आपण रिपोर्ट पाहू शकतो . .तसेच “All “हा फिल्टर सिलेक्ट करून आपण सर्व भौगोलिक विभागातील निरीक्षणे पाहू शकतो.

  • पीक: आपण वेगवेगळ्या पिकांनुसार निरीक्षणाचा रिपोर्ट पाहू शकतो. 

  • कीड आणि रोग यांची नावे: ठराविक कीड आणि रोग यांच्या नावानुसार आपण निरीक्षणाचा रिपोर्ट पाहू शकतो. 


३) आपणास हवे असलेले फिल्टर निवडल्यानंतर “Apply “या बटणवर क्लिक केल्यावर आपणासमोर रिपोर्ट दिसेल.

क्रॉप रिस्कच्या रिपोर्ट मधून आपल्याला खालील माहिती मिळते.

१. Cropped Area: एकूण Cropped  Area आणि शेतकऱ्यांच्या एकूण प्लॉट्स चा नंबर प्रथम दिसतो.

२. Observations: किती शेतकऱ्यांच्या  प्लॉट्सचे निरीक्षण घेतले गेले आणि त्यांचा Cropped  Area किती आहे,  हे  समजते.

३. आपण नोंद केलेल्या निरीक्षणांचे सादरीकरण , कीड आणि रोगाच्या तीव्रतेनुसार,  Low  (कमी) , Medium (मध्यम), High (जास्त) अश्या तीन भागांमध्ये केले जाते. तसेच  ह्या तीन प्रकारामध्ये किती प्लॉट्स येतात हे देखील समजते. 

४. अधिक माहितीसाठी तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या तीव्रतेच्या आयकॉनवर क्लिक करू शकता.

 उ. दा. " जास्त (High) तीव्रतेच्या च्या आयकॉनवर क्लीक केल्यास,  ज्या प्लॉट्साठी कीड किंवा रोगाची "जास्त" तीव्रतेची नोंद केली आहे, ते प्लॉट्स नकाशावर दिसतील.

५. त्या नकाशावर दिसणाऱ्या हिरव्या, पिवळ्या किंवा लाल चिन्हावर क्लिक केले असता कोणत्या शेतकऱ्याच्या, कोणत्या प्लॉट मधून, किती तारखेला, कोणत्या कीड किंवा रोग साठी निरीक्षण घेतले गेले हे आपणास समजते.


 डाउनलोड रिपोर्ट:

तुम्ही डाउनलोड बटण वर क्लिक करून CSV फाईल मध्ये रिपोर्ट मिळवू शकता.

 मिळालेल्या रिपोर्ट मधुन खालील प्रमाणे निरीक्षणाची पडताळणी करू शकता. 

१) पिकाचे नाव 
२) रोग किंवा किडीचे नाव 
३) निरीक्षणाची तारीख 
४) निरीक्षण ज्यांनी नोंद केले त्या user चे नाव 
५)निरीक्षणाची तीव्रता 
६) राज्य


क्रॉप रिस्क व्हिडिओ