क्रॉप क्वालिटी मॉडेल

 

किसानहबचे पीक गुणवत्ता साधन (क्रॉप क्वालिटी मॉडेल) वापरुन आपण पिकाची रासायनिक चाचणी करू शकतो त्यावरून आपल्याला पिकाची गुणवत्ता समजते. आपले पीक विविध देशांच्या बाजारपेठांमध्ये आणि वेगवेगळ्या ग्राहकांना त्यांच्या रासायनिक घटकाच्या  मागणी नुसार खरेदीसाठी योग्य आहे की नाही हे ठरवण्यासाठी क्रॉप क्वालिटी मॉडेल मदत करते. 

 

किसानहब प्लॅटफॉर्म मध्ये पिकांची गुणवत्ता अशी दिसते:   

 

खाली दिलेल्या स्क्रीनशॉट प्रमाणे ड्रॉपडाऊन वर क्लिक केल्यावर आपण आपल्या पिकानुसार टेम्पलेट्स निवडू शकतो. 

 

शोध (र्च): आपण पीक मालकाचे नाव किंवा प्लॉटचे नाव वापरून प्लॉट लिस्ट मध्ये प्लॉट शोधू शकतो.

तसेच आपण तारीखपीकप्लॉटची अवस्था आणि वेगवेगळया देशांनुसार(market suitablitity) देखील प्लॉट फिल्टर करू शकता. 

 

 

 

 

 

 

क्रॉप क्वालिटी मॉडेल किसानहब च्या मोबाइलला अँप  वेब प्लॅटफॉर्म वर पाहू शकतो.

1)मोबाइल अँप मध्ये प्लॉट कार्ड वर प्लॉट चे स्टेटस सिलेक्ट करणे त्यानंतर तो प्लॉट क्रॉप क्वालिटी मॉडेल मध्ये दिसून येईल

 

 



2)आपण वेब प्लॅटफॉर्म वर क्रॉप क्वालिटी मध्ये जाऊन अॅड न्यू रिजल्ट सिलेक्ट करून नवीन प्लॉटला लॅब कडून मिळालेला रिजल्ट अॅड करू शकता. 

नवीन रिजल्ट जोडा: वेब प्लॅटफॉर्म च्या क्रॉप क्वालिटी मध्ये जाऊन आपण अॅड न्यू रिजल्ट हे बटन वापरुन आपण आपल्या ज्या नवीन प्लॉटला रिजल्ट अॅड करायचा आहे तो शोधू शकतो. आणि त्या प्लॉट च्या रिजल्ट च्या संदर्भातील  सर्व माहिती अॅड करू शकतो.

त्यानंतर आपण प्रत्येक पॅरामीटर्स नुसार टेस्ट रिजल्ट अॅड करू शकतो किंवा आपण टेस्ट रिजल्ट एक पेक्षा जास्त कॉपी करून टेस्ट रिजल्ट्स मध्ये  पेस्ट करू शकतो. 

 

टीपः पीक मालकप्लॉटचे नाव (किंवा स्टोअर-लॉट नेम) आणि लॅब अनिवार्य आहेत.

आपण टेस्ट रिजल्ट मध्ये पीडीएफ किंवा फोटो देखील अॅड करू शकता.

एकदा आपण टेस्ट रिजल्ट अॅड केल्यावर त्या टेम्पलेटमध्ये असलेल्या मार्केटच्या मागनीनुसार त्या प्लॉट ची योग्यता मॉडेल स्वयंचलितपणे ठरवते.  

आपल्याला क्रॉप क्वालिटीच्या मुख्यपृष्ठाच्या टेबलमध्ये प्लॉट दिसतो, तीथे टेबलमधील प्लॉटचे नाव हायपरलिंक आहे. आपण त्या प्लॉट च्या नावावर क्लिक केल्यावर आपल्याला त्या प्लॉट साठी अॅड केलेला प्लॉट च रिजल्ट बघायला मिळेल. त्या मधून आपण आपल्या  पिकातील  रसायनिक अवशेस ( chemical Detection ) पाहू शकतो आणि आपला प्लॉट कोणत्या मार्केटला पास आणि कोणत्या मार्केट ल फेल आहे हे पाहू शकतो॰

 

आपण टेबलमधील पेन्सिलच्या चिन्हावर क्लिक करुन प्लॉट साठी अॅड केलेला रीपोर्ट एडिट करू शकता.

जनरेट कस्टमर रिपोर्ट :आपण जनरेट कस्टमर रीपोर्ट बटनावर क्लिक करून  "रेडी फॉर हारवेस्ट" स्टेटस असलेल्या सर्व प्लॉटची यादी मार्केट सुटेबिलिटी नुसार पाहू शकतो.

एक्सपोर्ट फिल्टर टेबल: आपण " एक्सपोर्ट फिल्टर टेबल " निवडून आपण फिल्टर केलेले प्लॉट ची क्रॉप क्वालिटी लिस्ट मार्केट सुटेबिलिटी नूसार CSV मध्ये डाउनलोड करू शकतो.