उपयोग :- किसानहब वेब प्लॅटफॉर्म मध्ये शॉर्ट टेक्स्ट मॅसेज ह्या सुविधेचा उपयोग करून आपण जे शेतकरी किसानहब अँपशी जोडले गेले आहेत त्यांना आपण एकाच वेळी आपला संदेश (मेसेज) पाठऊ शकतो. 

 शॉर्ट टेक्स्ट मेसेज पाठ्वण्याची पद्धत :- 

  1. किसानहब वेब प्लॅटफॉर्म मध्ये प्रवेश (Login) केल्या नंतर माय डॉक्स (My Docs) ह्या अप्लिकेशन वर क्लिक केले असता आपल्याला वरील बाजूस निळ्या रंगाचे ADD नावाचे बटण दिसेल. 
  2. ह्या ADD बटणावर क्लिक केले असता, त्यामध्ये खालील बाजूस Short Message हा पर्याय आपल्याला दिसेल


 

 

 3) Short Message   वर  क्लिक केले असता खालील स्क्रीन उघडेल.


 a) Message
या जागी   आपण जास्तीत जास्त १६० शब्दांमध्ये आपला मेसेज लिहू शकता. 

b) डाव्या बाजूच्या रकान्यात तुमच्या सर्व  शेतकऱ्यांच्या नावाची लिस्ट दिसेल. 

c) तुम्ही सर्व शेतकरी ADD ALL  ने सिलेक्ट करू शकता त्यावर ते उजव्या रकान्यात येतील किंवा REMOVE ALL ने सिलेक्ट केलेले शेतकरी काढून हि टाकू शकता . 

d) एखाद्या शेतकऱ्याचे नाव शोधून त्या ठराविक शेतकऱ्यांना सुद्धा तुम्ही मेसेज पाठवू शकता

e) SEND या बटण वर   क्लिक करून तुम्ही मेसेज पाठवू शकता

नोंद –

)  मेसेज पाठवत  असताना तुमच्या कडे चांगले इंटरनेट असावे.