AWS ( Automated Weather Stations) हवामान डेटा कसा एक्स्पोर्ट करावा ?
१. डॅश बोर्ड वरील Agromet ह्या पर्यायाच्या बाजूला असलेल्या बाणावर क्लिक करा त्याखाली आपल्याला Sensor List नावाचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
२. Sensor List वर आपल्याला AWS ( Automated Weather Station) हवामान स्टेशन ची लिस्ट दिसेल.
३. आपल्याला ज्या AWS चा हवामान रिपोर्ट डाउनलोड करायचा आहे त्याच्या बाजूला असलेल्या ३ टिम्बवर क्लिक करा आणि Export to EXCEL हा पर्याय निवडा.
४) Export to EXCEL हा पर्याय निवडल्यानंतर खालील चार्ट उघडेल
Stations - आपल्याला ज्या AWS चा हवामान डेटा एक्स्पोर्ट करायचा आहे ते निवडणे.
Data Frequency -- येथे Daily आणि Intraday असे २ पर्याय आहेत
a ) Daily - दिवसानुसार हवामान माहिती
b ) Intraday -- तासानुसार हवामान माहिती
Parameters -- हवामानाचे जे काय निरीक्षण आपणास हवे असतील ते निवडा. ( उदा. पाऊस , तापमान )
Start date आणि End Date -- येथे आपणाला ज्या कालावधी ची हवामान माहिती हवी आहे त्यानुसार तारीख निवडा.
Export -- यावरती क्लिक केले असता तुम्हाला हवामान रिपोर्ट हा तुमच्या किसान हब प्लॅटफॉर्म मध्ये असलेल्या रजिस्टर्ड मेल वर मिळतो.
नोंद - जर तुम्हाला रजिस्टर मेल अपडेट करायचा असेल तर डॅशबोर्ड वर उजव्या बाजुला असलेल्या सेटिंग बटनावर क्लिक Account मध्ये जाऊन तो अपडेट करावा. ( त्यावर तुम्हाला हवामान डेटा मिळेल)