क्रॉप इन्व्हेंटरी - कंपनीशी  संलग्न असलेल्या शेतकऱ्याच्या प्रत्येक प्लॉट ची पीक लागवडी पासून ते पीक काढणी पर्यंत ची संपूर्ण माहिती या चार्ट मध्ये दिसते त्यानुसार आपल्याकडे येणाऱ्या शेतमालाचे पुढील नियोजन करण्यात मदत होते. 

 क्रॉप इन्व्हेंटरी मध्ये जाण्यासाठी 

१) माय फार्म या अँप वर क्लिक करावे 

२) आपण समोर क्रॉप इन्व्हेंटरी उघडेल 

३)Season निवडावा उदा २०१९-२० 

४) वरती उजव्या बाजूला टीम ( शेतकऱ्याची यादी) आपल्या गरजे नुसार निवडावी, तसेच आपण ALL    teams , ALL Farms सिलेक्ट करून सर्व शेतकऱ्यांची प्लॉट ची माहिती पाहू शकता.

 

  •  Plot filter
     
    प्लॉट फिल्टर चा वापर करून आपल्याला हव्या त्या प्लॉटची माहिती बघू शकतो.
  • Crop filter
     
    क्रॉप फिल्टर चा वापर करून आपल्याशी संलग्न असलेल्या वेगवेगळ्या पिकांची माहिती आपण बघू शकतो, तसेच त्या प्रमाणे पुढे त्या पिकाची व्हरायटी निवडू शकतो
  • Expected tonnage
     
    आपण नोंदवलेल्या सर्व प्लॉटसाठीचे अपेक्षित असणारे उत्पादन यांची बेरीज एकत्रित पणे आपण पाहू शकतो, ज्याची नोंद आपण मोबाईल अँप तसेच वेब प्लॅटफॉर्म वरून केली आहे
  • Est. Yield (t/ha) या  ठिकाणी आपण सर्व प्लॉट साठी जे काही उत्पादन टाकले आहे त्यानुसार प्रति  हेक्टरी अंदाजे किती उत्पादन येत आहे हे समजते, ज्याची नोंद आपण मोबाईल अँप तसेच वेब प्लॅटफॉर्म वरून केली आहे.
  • Planted hectares
     
    आपल्याशी संलग्न असलेल्या सगळ्या प्लॉट ची एकूण किती हेक्टर वर लागवड केली आहे हे दर्शविते
  • Plots planted ; Plot harvested (पीक लागवड आणि पीक काढणी )एकूण प्लॉट पैकी किती प्लॉटसाठी लागवडीच्या तारखांची नोंद झाली आणि किती प्लॉट साठी पिकांची काढणी झाली हे आपण ग्राफिक्स ( ट्रॅक्टर) च्या माध्यमातून टक्केवारी मध्ये बघू शकतो.
  • नोंद -
    सर्व शेतकऱ्यांनी किंवा आपल्या फील्ड ऑफिसर नी किसान हब मोबाइलला अँप मध्ये जी प्रत्येक प्लॉट ची माहिती भरली आहे ती या क्रॉप इन्व्हेंटरी टेबले मध्ये दिसते तसेच ती माहिती आपल्याला EDIT सुद्धा करता येते.

     



वरील टेबल मध्ये आपण खालील माहिती बघू शकतो.

१) शेतकऱ्याचे नाव (Team)                                                                               

२) नोंदणी केलेले शेत (Field)

३) नोंद केलेला प्लॉट (Plot)

४) त्या प्लॉट वर लागवड केलेले पीक (Crop)

५) पिकाचे वाण (व्हरायटी ) (Variety)

६) पीक लागवडी खालील क्षेत्र (Cropped Area (ha))

७) अंदाजे उत्पन्न (टन / हेक्टर) (Est. Yield (t/ha))

८) एकूण उत्पन्न (टनामध्ये) (Total Tonnage (tonnes))             

९) पीक लागवडीची तारीख (Planting Date)

१० ) पीक काढणीची तारीख (Harvesting Date)


Export to CSV
 
या बटणाचा वापर करून आपण वरील माहिती डाउनलोड करू शकतो.