माती परीक्षणाचा रिपोर्ट
उपयोग - माती परीक्षणाचा रिपोर्ट किसानहब प्लॅटफॉर्म डिजिटल स्वरूपात अपलोड करून शेतकरी, ऍग्रोनॉमिस्ट किसानहबच्या मोबाइल अँप मध्ये अगदी सहज रित्या पाहू शकतात.
टीप - आपल्या माती परीक्षणाचा रीपोर्ट किसानहबच्या वेब प्लॅटफॉर्म ( कॉम्पुटर ) वरून आपलोड करावा लागतो. त्यानंतर तो रीपोर्ट मोबाइल अँप मध्ये प्लॉट कार्ड वर पाहता येतो.
माती परीक्षणाचा रीपोर्ट अपलोड करायची पद्धत -
A) मातीचे सॅम्पल ऍड करणे
B) माती परीक्षणाचा रिपोर्ट भरणे
- मातीचे सॅम्पल ऍड करणे
१) किसानहब वेब प्लॅटफॉर्म वर लॉगिन केल्यानंतर MyFarm वरती क्लिक करा त्यानंतर उजव्या बाजूला असलेल्या टीम मध्ये ज्या शेतकऱ्याचा माती परीक्षणाचा रिपोर्ट ऍड करायचा आहे त्यांचे नाव सिलेक्ट करून फार्म आणि प्लॉट निवडून MapView सिलेक्ट करा.
२) उजव्या बाजूला वरून ४ नंबर निळ्या रंगाचे बटण आहे. Add Soil Sample वर क्लिक करा. आता आपल्याला ज्या प्लॉट वरती Soil Sample भरायचा आहे त्या प्लॉट वर क्लिक केले असता वरील फोटो मध्ये दाखवल्या प्रमाणे विंडो ओपन होईल त्यामध्ये
a) Soil Sample Name
b) Soil sample depth
c) Soil Sample collection date
d) Notes
B) माती परीक्षणाचा रिपोर्ट भरणे
१) खालील फोटो मध्ये दाखवल्याप्रमाणे MyFarm वरील निळ्या रंगाच्या +ADD बटण वरती क्लिक करावे, त्यामधील Soil Test Result वरती क्लिक करावे.
a) Type to search for soil sample - माती परीक्षणाच्या सॅम्पल चे नाव शोधावे.
b) Laboratory - माती परीक्षण ज्या लॅब मधून झाले त्याचे नाव सिलेक्ट करा.
( टीप - सर्व लॅब ची नावे किसानहब टीमच्या मदतीने ऍड करून घ्यावीत)
३) त्यानंतर खालील मुख्य कॅटेगरी मध्ये रिपोर्ट मधील माहिती भरावी.
ऍड केलेला रिपोर्ट तुम्हाला वेब (कॉम्पुटर) वरती प्लॉट वर लाल रंगाच्या चिन्हाने लक्षात येईल .
मोबाइल प्लॉट कार्ड वरती खालील प्रकारे माती परीक्षणाचा रिपोर्ट दिसेल.